Ad will apear here
Next
पुण्यात पहिल्या चिलर कॉन्क्लेव्हचे आयोजन
पुणे : इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग अॅंड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (आयएसएचआरएई) पुणे चॅप्टर तर्फे पहिल्या चिलर कॉन्क्लेव्हचे पुण्यात हॉटेल ग्रँड शेरटन येथे १५ ते १७नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या कॉन्क्लेव्हकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मेट्रोपोलिटन आयुक्त आणि पीएमआरडीए पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गिते (आयएएस) उपस्थित राहतील;तसेच फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.च्या खरेदी विभागाचे उपाध्यक्ष श्रीराम बापट यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे.

या कॉन्क्लेव्हमध्ये चिलर इंडस्ट्रीमधील अत्याधुनिक तांत्रिक विकास,उत्पादने,अॅप्लीकेशन आणि ऑटोमेशन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार असून, यात अलबस इंजिनिअरींग कन्सल्टंटस प्रा.लि.चे संचालक शैलेश पाठक (को जनरेशन इन्स्टॉलेशन),किर्लोस्कर चिलर्स प्रा.लि.चे उपाध्यक्ष प्रशांत जोशी (मॅग्नेटिक बिअरींग कॉम्प्रेसर चिलर्स),भारतीय नौदलाचे निवृत्त सीडीआर प्रमोद पळसुले(चिलर्स इन मरिन अॅप्लीकेशन),जॉन्सन कंट्रोल हिताचीचे राष्ट्रीय विक्री प्रमुख संदीप गुप्ता (न्यू ट्रेंडस इन चिलर्स),किर्लोस्कर चिलर्स प्रा.लि.चे विक्री विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष गौरांग दाभोळकर (इर्मजिंग चिलर टेक्नोलॉजीज बाय किर्लोस्कर्स,क्रिस्टोपिया एनर्जी सिस्टिम्स (आय) प्रा.लि.,इंदौरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्षमा जैन (एनर्जी एफिशिएंट सोल्युशन्स बाय केहेम्स) आणि व्हर्टिव्ह एनर्जी प्रा.लि.चे विक्री विभागाचे संचालक संतोष पुराणिक (अडायबेटिक फ्री कुलिंग चिलर- न्यू डायमेंशन इन डेटा सेंटर चिलर) यांचा समावेश आहे. 

१६ व १७ नोव्हेंबर रोजी एसीआर ट्रेंडस 2017 (ट्रेंडींग टुवर्डस सस्टेनेबल एक्सलन्स) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  ‘एचव्हीएसीआर फ्युच्योरॉलॉजी’ या विषयावर चर्चासत्र होणार असून त्यासाठी  गोवर्धन इको व्हीलेजचे संचालक गौरांग दास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. व्होल्टास लि.च्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाचे वरिष्ठ सरव्यवस्थापक बी.रविंद्रनाथ,एऑन इकोटेक प्रा.लि./रोझमेक्स इकोटेक प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक जगदीप सिंग,आर्कलाईट स्पेशालिटी लॅम्पस लि.आणि एरोप्युअर युव्ही सिस्टिम्स प्रा.लि.चे संस्थापक संचालक अविनाथ कुलकर्णी हे वक्ते या वेळी मार्गदर्शन करतील.

कॉन्क्लेव्हच्या तिसऱ्या  दिवशी रेफ्रिजरेशन उद्योगातील आव्हाने या विषयावर चर्चासत्र होणार असून, माजी आमदार आणि नॅशनल शिपिंग बोर्डचे अध्यक्ष प्रदीप रावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. पिल्लई इंजिनिअरींग कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक अविनाश शाळीग्राम,डीसीई रेफ्रिजरेशन प्रा.लि.चे प्रदीप वाणी,इकोचिलचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल गोगटे आणि ट्रस्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक सदस्य मनिष कुलकर्णी हे वक्ते मार्गदर्शन करतील.

या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होण्याकरिता संपर्क :  
आयएसएचआरएई कार्यालय:  (०२०) २४३६००७५ , ९९२१५ १५०४४             
केदार पत्की (अध्यक्ष, आयएसएचआरएई,पुणे चॅप्टर) : ९७६५३९०५८४ 
सुरज रानडे (नवनिर्वाचित अध्यक्ष आयएसएचआरएई,पुणे चॅप्टर) : ८८८८८ ३४३३५ 
नंदकिशोर माटोडे (सचिव, आयएसएचआरएई,पुणे चॅप्टर) : ९९२३२ ४१४५०  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZUOBI
Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language